Tuesday, May 13, 2008

धुंद एकांत हा..

धुंद एकांत हा, प्रीत आकारलीसहज मी छेडीता, तार झंकारलीजाण नाही मला,प्रीत आकारलीसहज तू छेडीता, तार झंकारली

Monday, May 12, 2008

ही स्पंदन फक्त तुझ्याचसाठी


प्रेम केले मी तुजवाराभावना अर्पिल्या तुजवर न काही ठेवले माझ्यासाठीसारी स्पंदन फक्त तुझ्याचसाठीखेळत राहीलो एकटाच मी तुझा खेळ सावल्यांचा पण खेळ मी सुद्धा खेळलोह्र्दयाच्या ह्या खेळात...माझी स्पंदन फक्त तुझ्याचसाठीकोणी नसावे त्या ह्रदयात असावीस फक्त तू तिथेतुझं ह्र्दय असावे मजसाठी माझ सर्वस्व फक्त तुझ्याचसाठीतुझ्यानेच उगवावा मज दिस तुझ्यानेच संपावी मज रात्र असावे एखादे जग जिथेअसावे तू माझ्यासाठी व मी फक्त तुझ्याचसाठी...तुझे श्वास आहेत माझ्यासाठीमाझा सहवास आहे तुझ्यासाठीतुझे ह्र्दय आहे माझ्यासाठी व माझे तुझ्याचसाठीआहेत ही सारी स्पंदनं....फक्त तुझ्याचसाठी..

आयुष्याचा अर्थ


आयुष्याचा अर्थ शोधण्यासभटकत आहे मी..... स्वप्न आणि वास्तवतेतील दुवा शोधते मी..... आपुलकित ही कोरडे पणअनुभवत आहे मी... नात्यांमधे हरवलेले भाव शोधते मी... मनात उठलेले वादळ शमवत आहे मी.... अश्रून्सोबत विरून गेलेले हास्य शोधते मी..... जिंकण्यासाठी आयुष्याचा डाव खेळते मी... माझ्या पराजायाची आजसुधाकारण शोधते मी.......
नमस्कार मित्र आणि मैत्रिणिनो..... मी पूजा साधी सरळ आणि खूप मस्तीखोर मराठी मुलगीतसा हा माझा पहिलाच बॉल्ग.. माझ्या आवडणर्‍या कवितांचा.... आशा आहे की आपल्याला नक्की आवडेल.....धन्यवाद...!!!


भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
कवी - सुरेश भट...


एकच क्षण हवाय तुझ्याबरोबर बोलायला
सुख तुला द्यायला दुख तुझे जाणून घ्यायला

एकच क्षण हवाय तुझ्यासमोर बसायला
तुला डोळे भरून पाहायला तुझे चित्र हृदयात कोरायला

एकच क्षण हवाय तुझ्याबरोबर चालायला
पुढील आयुच्या शुभेच्या द्यायला आन् अखेरचा निरोप घ्यायला