Monday, June 28, 2010



आयुष्य आणखी काय असतं ?


आयुष्यात अस ही वळण येत. नाही नाही म्हटल तरी हे वळण कधी अनपेक्षितपणे येत, तर कधी कधी धोक्याची सूचना देऊन येत. पुर्वसूचना मिळो की अचानक येवो,'वाट तमाची एकाकी' अस त्यावेळी वाटत.हा एकटेपणाच अटळ असतो. खर म्हणजे जीवनाच्या रस्त्यावरून आपली गाडी भरधाव वेगाने धावत असते. आजूबाजूला निसर्ग आपल्या सौंदर्याची उधळण करीत असतो. मित्र, साथीदार वा जोडीदाराची रमनीय सोबत असते. आपला हात त्यान प्रेमाने हातात घेतलेला असतो. अशा वेळीही आपण एकटेच असतो . त्या एकटेपणाची जाणीव नसते इतकच. पण अंधकारमय वाट असताना पायाखालची वाट दिसत नाही. दिशा कळत नाही. दिशादर्शक सूचना फलक असून नसल्यासारखे असतात आणि बरोबर कोणीही असत अस नाही. आशावेळी मनातल्या भीतीची भूत मात्रा खूप त्रास देतात. अशाचवेळी आपल्या मनाच्या सामर्थ्याची, मनोबळाची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. अशा प्रसंगी मन स्थिर राहील, शांतपणे आकाशात दिसणारा ध्रुवतारा शोधला किंवा चंद्राची फिकट कोर सापडली तरी मनाला धीर येतो आणि आपण त्या रस्त्यावरून वाटचाल करीत राहतो.मग आपल्या लक्षात येत की, रस्ता आणि परिसर अपरिचित असला तरी आपण स्वतःला ओळखतो . आपले पाय, आपले डोळे, आपलं मन आणि आणि सर्वात महत्वाच म्हणजे ' आपला सिक्स्थ सेन्स ' आपल्याला उत्तम साथ करतो. आपला आतला आवाज आतून धीर देतो. म्हणतो, जमेल तुला, धीर नको सोडू , अजुन खूप जिगर शिल्लक आहे तुझ्यात . अजुन काहीतरी मिळवायचय , कमवायच आहे .हा तुझ्या आयुष्यातला टप्पा आहे. तुझी रचना, तुझ जीवन अस वाटेत पडून राहण्यासाठी निर्माण झालेल नाही , त्या निमिकांचा काही तरी हेतू असणार, काही तरी योजना असणार , त्यावर विश्वास ठेवून पाऊल उचलल की वाटत, आयुष्याच्या खडतर दिवसातून बरच काही शिकता येत . आशा दुरदम्य असते आणि आकांक्षेची भरारी उत्तुंग असते.

मी एक झाड -

हे मानवा कृपा करून विसरू नको........

हिवाळ्यात तुझ्या शेकोटीतील उब आहे मी

उन्हाळ्यात तुझ्या डोक्यावरील छाया आहे मी

माझी फळे प्रवासात तुझी भूक भाग

वतात आणि त्यांचे रस तुझा सुका लेला घसा ओला करतात

तुझ्या घराचा मी खांब आहे तुझ्या छप्रराची तुलई मी आहे

नदी नाल्यातून नेणारी नाव मी आहे

विश्रांती देणारा तुझा मंचक मी आहे

मी तुझ्या कुदलीचा दांडा आहे नांगरचा फळ मी आहे

,गाडीच चाक आहे पाळण्यामध्ये तुला जोजावणारा मीच

होतो आणि स्वर्गाच्या स्वारीचे वाहनही मीच असणार आहे......

pooja